गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज मठात भक्तिमय वातावरणात महाप्रसाद; मसुगडे वस्ती येथे सभामंडपासाठी ₹१० लाखांचा निधी मंजूर
हनुमंतवाडी (ता. फलटण) प्रतिनिधी :


brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज मठ, मसुगडे वस्ती, हनुमंतवाडी (ता. फलटण) येथे भक्तिमय वातावरणात गुरुपूजन, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले. मठाधीश ह.भ.प. दीपक शेटे महाराज यांच्या आशीर्वादाने पार पडलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याच प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराज मठासाठी अत्यंत आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली. सन २०२५-२६ च्या इतर ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत मसुगडे वस्ती येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठासाठी सभामंडप उभारणीस ₹१० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभामंडपामुळे भविष्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करता येणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमादरम्यान मठाधीश ह.भ.प. दीपक शेटे महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मठाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. सभामंडपासाठी माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ₹१० लाखांचा निधी मंजूर झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सर्वांचे लाडके नेते शिवरूप राजे खर्डेकर, रणजीत शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्यामुळे हे स्वप्न साकार होत आहे.”
यावेळी मठाच्या विकासासाठी आणि सेवाकार्यास निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या अनेक सेवेकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सुनील शिंदे, दिलीप शिंदे, धीरज शिंदे, अनिल शिंदे, गणेश बबन शिंदे, किरण भरणे, नवा मुळीक, श्रीधर (दादा) मुळीक, अरिहंत निकम, प्रज्वल शिंदे, तानाजी चव्हाण, किरण चव्हाण आणि नाना (बाळासाहेब) मसुगडे यांचे विशेष योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच गेली तब्बल २५ वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज मठाची सेवा करत, मठाची संपत्ती जपून तिचे संरक्षण व व्यवस्थापन अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळणारे पुजारी श्री. सुभाष बाबुराव चव्हाण यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शिवरूप राजे खर्डेकर, रणजीत शिंदे, लालासाहेब साबळे, युवा नेते शेखर झेंडे,हरीश कदम, पोपटराव पवार, नितीन साबळे, अकोबा शिंदे, बापूराव पवार, अमोल शिरवळकर, शिवसेना पदाधिकारी अमित पवार तसेच सभामंडपासाठी मोलाचे योगदान देणारे बाळासाहेब जगदाळे यांच्यासह हनुमंतवाडी गावातील ग्रामस्थ, महिला आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या या पावन सोहळ्यात धार्मिक श्रद्धा, समाजातील एकोपा आणि विकासाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मठासाठी मंजूर झालेला सभामंडप हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून, भविष्यातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
— लालासाहेब साबळे
मुख्य संपादक, लोक अदालत न्यूज









