फलटण तालुक्यात डीपी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण; एमएसईबी प्रशासनाचे आभार
फलटण तालुक्यात माझ्या घरगुती, कंपनी तसेच हॉटेलच्या वीजपुरवठ्यासाठी असलेल्या डीपीवरील फ्युज नसणे व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने वीजपुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. यासंदर्भात सुमारे दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.
सदर तक्रारीची दखल घेत आज संबंधित डीपीवर आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात आले असून फ्युज बसविणे, परिसरातील झाडेझुडपे हटविणे व इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी मी स्वतः एमएसईबीच्या प्रशासकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन जलद गतीने काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल.
तसेच फलटण तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरातील डीपी जळाली असेल, डीपीला फ्युज नसतील किंवा वीजसंबंधित अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील रा
हीन.









