फलटणजवळ वारकरी दिंडीवरील कथित हल्ला प्रकरणात पोलिसांकडून स्वतः पुढाकार घेत अखेर गुन्हा दाखल ! तपासाला वेग !


फलटणजवळ वारकरी दिंडीवरील कथित हल्ला प्रकरणात पोलिसांकडून स्वतः पुढाकार घेत अखेर गुन्हा दाखल ! तपासाला वेग !

 

फलटण तालुक्यात वारकरी दिंडीवरील कथित हल्ला, मारहाण व लूटप्रकरणी महत्त्वाची घडामोड घडली असून, आज (दि. १२ जुलै) संबंधित दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांनी औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तक्रार प्राप्त होताच फलटण ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू करून प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे.

आषाढी वारीकरिता पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी आळंदीकडे परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर ५ जुलैच्या मध्यरात्री पुणे-पंढरपूर महामार्गावरील वडजलजवळील काशीदवाडी फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी कथित हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना मारहाण होऊन त्यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचा तसेच रोकड लुटल्याचा आरोप करण्यात आला होता.

घटना घडल्यानंतर वारकऱ्यांनी डायल ११२ वर संपर्क साधल्यानंतर ग्रामीण व शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी वेळेत आळंदीकडे पोहोचणे आवश्यक असल्याने त्यावेळी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यानंतर आज सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे मुक्कामी असलेल्या दिंडीकडे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी भेट देऊन दिंडी चालक व सदस्यांचे जबाब नोंदविले. त्यानंतर संबंधित दिंडी चालकांनी या प्रकरणी औपचारिक तक्रार दिली.

“घटना घडल्यानंतर आम्ही ११२ क्रमांकावर फोन केला होता. पोलीस तत्काळ घटनास्थळी आले होते. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी आम्हाला पुढे जावे लागल्याने त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार देता आली नाही. पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या कामकाजाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही,” असे दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांनी जबाबात नमूद केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, उपलब्ध पुरावे, घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक बाबी तसेच संबंधित साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे सखोल तपास करण्यात येत आहे.

वारकरी दिंडीच्या सुरक्षेशी संबंधित या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहिले असून, घटनेमागील सत्य परिस्थिती उघड करून दोषींना न्यायालयासमोर उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

—————————-

दरम्यान, “या प्रकरणातील हल्लेखोर कोणताही असो, त्याची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. दोषींना शोधून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यां­नी दिला.


हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

8
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

error: Content is protected !!