जिल्हा उद्योग केंद्र, सातारा येथे स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी
सातारा : जिल्हा उद्योग केंद्र, सातारा येथे स्व.उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष मा. संदीप जगताप, लोक अदालत न्यूजचे मुख्य संपादक लालासाहेब साबळे व उपसंपादक सुमित पवार यांनीही उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत श्रद्धापूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी कै. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजापुढे कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त
केला.









