युवासेना जिल्हाध्यक्षपदी अमित दादा पवार यांच्या नियुक्तीची युवकांमधून जोरदार मागणी; माण-खटावमध्ये संघटन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका


सातारा विवेककाटकरप्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. एकनाथ भाई शिंदे साहेब, युवकांचे आधारस्तंभ डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश दादा सरनाईक साहेब, पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण दादा साळी साहेब तसेच मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माण-खटाव विधानसभा मतदारसंघात युवकांचे संघटन बांधण्यासाठी व शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्यासाठी युवासेना जिल्हा समन्वयक मा. अमित दादा पवार हे अहोरात्र (24×7) कार्यरत आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन उभे राहत असून, युवकांमध्ये युवासेना अधिक मजबूत होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत युवकांमधून त्यांची युवासेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. पक्षश्रेष्ठी निश्चितच त्यांच्या कार्याची दखल घेऊन योग्य न्याय देतील, अशी युवकांची अपेक्षा आहे.

अमित दादा पवार यांनी युवासेना BAL-2 अभियानामध्ये १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सदस्य नोंदणी अभियानातही मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करून संघटन विस्ताराचे उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच सातारा जिल्हा व माढा लोकसभा क्षेत्रात युवासेनेच्या पहिल्या दहा शाखांच्या लोकार्पण सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले आहे.

दिनांक २१ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व माढा लोकसभा संपर्कप्रमुख मा. सुजित भैय्या खुर्द यांच्या नेतृत्वाखाली आयोजित युवा संवाद मेळाव्यास फलटण व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून हजारो युवकांनी मा. अमित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. या मेळाव्यात युवासेना जिल्हा समन्वयक अमित दादा पवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी अशी युवकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली.

बैठकीस उपस्थित मान्यवर:

• महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व माढा लोकसभा संपर्कप्रमुख मा. सुजित भैय्या खुर्द

• युवासेना जिल्हाप्रमुख सचिन चव्हाण

• विधानसभा संपर्कप्रमुख अनिल मासाळ

• हनुमंत राजगे

• युवासेना जिल्हा समन्वयक अमित पवार

• युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतिक रिटे

• शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी

• नाना गुरव

• करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख विशाल गायकवाड

• माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख विजय कोकणे

• सोलापूर जिल्हा युवासेना समन्वयक निखिल चांदगुडे

• माढा विधानसभा संपर्कप्रमुख अमोल केसरी

• पंडित साळुंखे

• सोलापूर युवासेना शहर प्रमुख समी मौलवी

• सुभाष पवार

  • यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, युवासैनिक व शियुवासेना जिल्हाध्यक्षपदी अमित दादा पवार यांच्या नियुक्तीची युवकांमधून जोरदार मागणी; माण-खटावमध्ये संघटन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका

9
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!