[
दादा, वहिनी, भैय्या, दीदी, बाबा, राजे असे डझनभरपेक्षा भाऊ आणि ताई दोनच भारी…
लोक अदालत :
उपसंपादक सुमित पवार
माळशिरस तालुक्याला आमदार काय असतो रामभाऊंनी दाखवून दिले, जिल्हा परिषदेचा सभापती काय करू शकतो, संस्कृतीताई यांचे कौतुकास्पद कार्य सुरू आहे…
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सध्याचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी आपल्या कार्यातून माळशिरस तालुक्याला आमदार काय असतो हे विकास कार्य व सामाजिक कार्यातून दाखवून दिलेले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांचे कौतुकास्पद कार्य सुरू असल्याने जिल्हा परिषदेचा सभापती काय करू शकतो, हे या दोघांनी आमदार व सभापती कार्यातून आपली जनतेसमोर वेगळी ओळख निर्माण केलेली असल्याने दादा, वहिनी, भैय्या, दीदी, बाबा, राजे असे डझनभर राजकारणी समाजामध्ये वावरत आहेत. रामभाऊ आणि संस्कृतीताई यांच्या कार्यामुळे डझनभर पेक्षा भाऊ आणि ताई दोनच भारी, अशी सर्वसामान्य, गोरगरीब व पीडित जनतेमधून अभिमानाने बोलले जात आहे…
देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीने ऊसतोड मजूर कामगाराचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले रामभाऊ सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, पीडित, वंचित, शोषित जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली होती. तालुक्यातील जनतेने कामाचा माणूस म्हणून आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहिलेले आहे. सर्वसामान्य कुटुंबांमधून राम सातपुते आलेले असल्याने जन माणसांच्या गरजा ओळखून तालुक्यात काम केलेले आहे. गरिबांची मोफत ऑपरेशन केलेली आहेत. शरीराचा कोणताच अवयव ऑपरेशन करण्याचा राहिलेला नाही, अशी पीडित लोकांची ऑपरेशन केलेले आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात प्रस्थापितांकडून विकासापासून कायम वंचित कोसो दूर ठेवलेले अनेक रस्ते, पूल, पाणी असे प्रलंबित प्रश्न सोडवलेले आहेत. पिढ्यानपिढ्या कायम दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवलेले निरा देवधर पाण्याचा पहिल्यांदाच विधानसभेत राम सातपुते यांनी आवाज उठवलेला होता. कायम जनतेच्या संपर्कात राहून आमदार आणि जनता यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी तालुक्यात जनता दरबाराची प्रथा राम सातपुते यांनीच सुरू केली. जनतेचा आशीर्वाद विकास कामांमुळे कामाचा माणूस, पीडित जनतेच्या आरोग्याची सेवा केल्याने आरोग्यदूत, जनतेने संबोधलेले असे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत राम सातपुते यांना विधानसभेच्या निवडणुकीत चार पिढ्या राजकारणात असणारे मोहिते पाटील व चाळीस वर्ष राजकीय संघर्ष करणारे जानकर दोन्ही गट एकत्र येऊन सुद्धा राम सातपुते यांनी एक लाख आठ हजार मते घेतलेली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दहिगाव जिल्हा परिषद गटात सर्वसामान्य जनता व मतदारांच्या मागणीनुसार संस्कृतीताई सातपुते यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली होती. दहिगाव जिल्हा परिषद गटात मोहिते पाटील व जानकर या दोन्हीही राजकीय शक्तींचा एकाच वेळी पराभव करून संस्कृतीताई जॉईंट किलर ठरलेल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संस्कृतीताई सातपुते यांना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण सभापती पदाची जबाबदारी दिलेली आहे.
संस्कृतीताई सातपुते यांनी समाज कल्याण सभापती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून तालुक्यातील विकासकामांना एकाच वेळी 10 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणणाऱ्या तालुक्यातील पहिल्या सभापती ठरलेल्या आहेत. माळशिरस तालुक्याला आमदार काय असतो हे रामभाऊंनी दाखवून दिलेले आहे जिल्हा परिषदेचा सभापती काय करू शकतो, संस्कृतीताई यांचे कौतुकास्पद कार्य सुरू असल्याने दादा, वहिनी, भैया, दीदी, बाबा, राजे पेक्षा भाऊ आणि ताई दोनच भारी असे सर्वसामान्य, गोरगरीब व पिडीत जनतेमधून अभिमानाने बोलले जात आहे.









