सुमित पवार, उपसंपादक फलटण प्रतिनिधी :
मेन 34 फाट्यावर दारे क्रं. 8 सिंचन पाण्याच्या वापराबाबत व होत असलेल्या पाण्याचे आपव्यय याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पाटकरी एरिगेशन अधीकारी कविता जाधव यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान संबंधित सोसायटीचे कर्मचारी व शेतकरी सदर ठिकाणी उपस्थित होते
संभंधित कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या वापराची माहिती घेण्यात आली. यावेळी इथून पुढे सिंचनाच्या पाण्याचा गैरवापर होणार नाही, याबाबत त्यांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना नियमांनुसार पाणीपुरवठा करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले
स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, लोक अदालत न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने तत्काळ दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सिंचन विभागाकडून यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित पाहणी व नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
– लोक अदालत न्यूज “जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध”🙏









