तातवडे घाटात काळाचा घाला! डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू पुसेगाव येथील योगेश जगताप यांचा दुर्दैवी अंत**


तातवडे लोक अदालत न्यूज | सुमित पवार

 

तातवडे घाटात दुर्दैवी घटना : डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने तरुणाचा मृत्यू, गाडीतील इतर प्रवासी किरकोळ जखमी

 

तातवडे घाट परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, डोंगराच्या कड्यावरून अचानक कोसळलेल्या दगडामुळे एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश जगताप (वय 27,  )** हेपुशेगाव वरून पुण्याकडे जात असताना तातवडे घाटात ही घटना घडली.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाट रस्त्यावरून प्रवास सुरू असताना अचानक डोंगरावरून मोठा दगड खाली कोसळला. हा दगड थेट वाहनाच्या चालकाच्या दिशेने आल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

 

घटनेनंतर जखमी अवस्थेत योगेश जगताप यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहनातील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, तसेच पोलीस हवालदार गणेश यादव आणि वैभवी भोसलेबनकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरात दरड कोसळणे व दगड घसरण्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

प्रतिनिधी : सुमित पवार

लोक अदालत न्यूज

 

टीप: पावसाळा चालू आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या


हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

8
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

error: Content is protected !!