हणमंतवाडीत होणार चुरशीची लढत


हनुमंतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मा.खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हनुमंतवाडी, प्रतिनिधी :

आगामी हनुमंतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून भारतीय जनता पक्षाचे मा.खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत, पारदर्शक कारभार, मूलभूत सुविधांचा विकास, युवकांना संधी, महिला सक्षमीकरण तसेच शेतकरी हिताचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार या पॅनलकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या पाठिंब्यावर विश्वास ठेवून हे पॅनल निवडणूक लढविणार असल्याचे गटनेते रंजीत शिंदे व लालासाहेब साबळे यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायतीत विकासाभिमुख नेतृत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने हे पॅनल उभारण्यात येत असून गावातील विविध घटकांतील कार्यकर्ते आणि नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पॅनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पॅनलमधील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार असून निवडणूक प्रचारालाही वेग येणार असल्याची माहिती मिळत आहे. हनुमंतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

8
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

error: Content is protected !!